Shocking News : डिलिवरी बॉयने (Delivery Boy) जेवणाचे पार्सल दिल्यानंतर जबरदस्तीनं तरूणीचं चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या येवलेवाडीतल्या (Yewalewadi) नामांकित सोसायटीत घडलाय. 19 वर्षीय तरुणीनं कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhawa Police stattion) याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
नेमकी काय घडली घटना?
Online Food ॲप वरून मागविलेले जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय तरुणीचं जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी डिलिव्हीर बॉयला अटक करण्यात आलं असून रईस शेख (वय 40, रा.कोंढवा) असं आरोपीचं नाव आहे.
19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार केली आहे. फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने Online फूड ॲप करून जेवण मागवलं होतं. जेवणाचं पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितलं.
पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढलं आणि त्यांच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतलं. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.