‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Nov 14, 2017, 08:51 AM IST
‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’ title=

आष्टी​ : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आष्टी येथे भाजपचे बाळासाहेब आजबे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. धस यांनी पंधरा कोटी रुपये घेऊन आपले पाच सदस्य पालकमंत्री यांना विकले आणि ते आम्हाला शहाणपण शिकवीत आहेत.राष्ट्रवादीने धस यांना सगळं दिलं मात्र त्यांनी धोका दिला,आता त्यांना कायमच घरी बसवा असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप फेटाळले आहेत. प्रत्येक प्रकरणात तोडपाणी करणाऱ्या धनंजय मुंडेंना काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळे दिसत आहे, असेही सुरेश धस म्हणाले. धनंजय मुंडेंनी आपल्यावर खोटा आरोप केल्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जात तीन वर्षात दीड पटीने वाढ झाली आहे. सरकार केवळ बनवाबनवी करत असून यांच्याच काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या व कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. आमचे सरकार असताना खुनाचा गुन्हा नोंदवा म्हणणाऱ्यांवर आता खुनाचा गुन्हा नोंदवायला हवा.