मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकासआघीडाला मोठा धक्का बसल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. बहुमत असताना देखील महाविकासआघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा किंगमेकर ठरले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचही जागा निवडून आणल्या. महाविकासआघाडीतील मतं फुटलं आणि संघर्ष होणार अशी शक्यता निर्माण झाली. विधानपरिषदेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीची बातमी आली आणि राज्याच्या राजकारणात पु्न्हा भूकंप झाला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला एकूण 134 मतं मिळाली आणि देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा राज्याच्या जनतेला पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ नसताना ही आपले उमेदवार निवडून आणले आणि फडणवीसांची चाल यशस्वी झाली.
शिवसेनेतून मतं फुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी दुसऱ्या दिवशी लगेच आमदारांची बैठक बोलावली. पण एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार नॉट रिचेबल झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 35 आमदार गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलबाहेर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मोठं खिंडार पाडण्याचा डाव आखला. शिवसेनेचे आमदार फोडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानंतर फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीत आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.