पाण्याच्या टाकीत पडून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Updated: Jun 15, 2018, 07:40 PM IST

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. महात्मा फुले नगर येथील 9 वर्षीय कुणाल नावाच्या मुलाचा शौचालयाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालाय.  कुणाल सुरेश बागुल असं ९ वर्षीय मुलाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्याअनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.