Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याने बहाणा करुन दर्शनाला राजगडावर नेले आणि..

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 23, 2023, 06:57 PM IST
Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की... title=
Darshana Pawar Murder Case । Rahul Handore arrested

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली. राजगडाच्या येथे पोलिसांना तपास करताना माहिती मिळाली आणि तसापाची चक्रे जोरदार फिरु लागली. मात्र, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी युक्ती केली. त्यानंतर तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याला दर्शनाबरोबर लग्न करायचे होते. मात्र, दर्शना हिच्या घरच्यांकडून या लग्नाला तीव्र विरोध होता. तसेच दर्शना एमपीएससी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि घरच्यांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरु केली. याची माहिती मिळताच राहुल हंडोरे हा अधिक बैचेन होता. त्याने दर्शनाला एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर बाईकवरुन फिरण्यासाठी राजगडावर नेले. पण तेथेच दर्शनाचा घात झाला. तेथे राहुल याने तिला कायमचे संपवले. तेथून तो एकटाच राजगडावरुन खाली आला आणि बाईकवरुन तो पसार झाला.

आणि तपासाचा वेग वाढवला...

पोलिसांना सापडू नये म्हणून त्याने रेल्वेने प्रवास सुरु केला. पुण्यातून बाहेर पडला. त्याने पश्चिम बंगाल ते अंधेरी असा प्रवास केला. छत्तीसगड, मध्य प्रदेश असा रेल्वे प्रवास करत राहिला. सततचा रेल्वे प्रवास करत असताना त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. ज्या ठिकाणी दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला त्या ठिकाणी पोलिसांनी कसून तपास केला. ती राजगडावर एकटी आली होती का? तिला कोणी आणलं होतं की ती कोणाबरोबर आली होती? असे प्रश्न पोलिसांना पडले. त्यानंतर तपासाचा वेग वाढवला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु करण्यास सुरुवात केली. 

राजगडाच्या जवळ एक छोटे हॉटेल होते. त्याठिकाणी त्यांनी चौकशी केली. त्यावेळी एक बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राजगडावर दोघे गेल्याचे समजले. मात्र, येताना तो (राहुल हंडोरे) एकटाच खाली आला. पोलिसांनी अधिक खातरजमा करण्यासाठी तेथील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की, एक तरुण एकटाच दिसत आहे. त्यानंतर पोलिसांना एक धागा सापडला आणि तेथून तपासाला गती आली. पोलिसांनी याबाबत कोणाला काहीही थांगपत्ता लागू दिला नाही. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली होती. 

... म्हणून पोलीस त्याला पैसे पाठवायचे

दर्शना पवार हिचा कोणी मित्र आहे का? याची चौकशी केली. त्यावेळी राहुल हंडोरे याचे नाव समोर आले. तसेच दर्शनाची हत्या झाली तेव्हापासून राहुल हा गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस होत नव्हते. अखेर पोलिसांनी एक मोठी युक्ती शोधली. नातेवाईकांची चौकशी करताना कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल फोन घेतला. त्यावरुन त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवला. तुला काही पैशाची गरज आहे का? त्यानंतर राहुल यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. पोलिसांना आता मोठा पुरावा हाती आला आणि त्याचे लोकेशन ट्रेस होऊ लागले. तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. पैशाची गरज त्याला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याचेवळी तो कुठे कुठे फिरतोय आणि त्याचे लोकशन मिळेल यासाठी पोलिसांनी त्याला पैसे पाठविण्यास सुरुवात केली आणि त्याचा मागोवा काढला. अखेर राहुल हंडोरे याला मुंबईवरुन पुण्याकडे जात असताना पोलिसांनी अटक केली.

मुंबई - पुणे प्रवास करताना अटक

आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. तो मुंबईवरुन पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दर्शनाच्या हत्येनंतर चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी दर्शना पवारची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली. राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दर्शना पवार हिच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, अशीही त्याने माहिती पोलिसांनी दिली.