राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमी नाचली; राजकारणात वादाची ठिणगी पेटली

सबसे कातील गौतमी पाटील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही चर्चेत राहिली,गोदिंयातील कार्यक्रमात गौतमी राष्ट्रावादी पुन्हा गाण्यावर थिरकल्यानं चर्चांना उधाण आलं  

Updated: Nov 20, 2023, 10:57 PM IST
राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमी नाचली; राजकारणात वादाची ठिणगी पेटली  title=

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही चर्चेत राहिली. बैलाचा वाढदिवस असो किंवा तिच्या कार्यक्रमात झालेला गदारोळ, खुर्च्यांची तोडफोड असो ती कायमच चर्चेत असते.यावेळी मात्र स्टेजवर गौतमीचा 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर डान्स पाहायला मिळाला. गौतमी लचकत, मुरडत नाचताना दिसली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गौतमी पाटीलचा नाच आणि भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं प्रक्षेपण एकाचवेळी करण्यात आलं. मंचावर एकीकडे गौतमी पाटील थिरकत होती आणि दुसरीकडे मोठ्या पडद्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या विश्वचषक सामन्याचा थरार रंगला होता. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर गौतमी थिरकल्यानं चर्चा झाली ती काका पुतण्यांची...एकसंध असलेली राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेलीये. त्याआधी अजित पवार आणि शरद पवारांनी गौतमीबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

गौतमी पाटील आणि गोंधळ असं समीकरण नेहमीच पाहायला मिळतं. मात्र गोंदियातील कार्यक्रमात असा कुठलाही गोंधळ पाहायला मिळाला नाही. गोंधळ नसला तरी राष्ट्रवादी पुन्हा गाण्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीतील दुफळीची चर्चा मात्र रंगली.

अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम  नको - अजित पवारांनी दिल्या होत्या सूचना

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करू नका असे आदेश अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना दिलेयत.राज्यात लावण्यांच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागल्याने गावोगावी आयोजन केलं जातंय. त्यामुळे अश्लील डान्स करणा-यांच्या कार्यक्रमांबद्दल राष्ट्रवादीने भूमिका घेतलीय. राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी केली. या तक्रारीनंतर अजित पवारांनी तातडीने पदाधिका-यांना सूचना दिल्यायत. तसंच लावणी कार्यक्रमासाठी सेन्सॉर लवकरात लवकर सुरू करण्याबाबत देखील प्रयत्न करणार असल्याचं अजित पवारांनी आश्वासन दिलंय.

गौतमी पाटीलनं अजित पवारांची माफी मागितली

लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलनं अजित पवारांची माफी मागितलीय. अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटलंय. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करली होती.