शेतात आढळली दीडशे किलो वजनाची मगर

लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बटनपूर परिसरातील मांजरा नदी पात्रात ८ फूट लांबीची मगर सापडल्याने खळबळ उडाली. 

Jaywant Patil Updated: Mar 30, 2018, 04:52 PM IST
शेतात आढळली दीडशे किलो वजनाची मगर title=

लातूर : लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बटनपूर परिसरातील मांजरा नदी पात्रात ८ फूट लांबीची मगर सापडल्याने खळबळ उडाली.  मांजरा नदीपात्राच्या काठावर असलेल्या शेतातील एका खड्ड्यात ही मगर बसली होती. ग्रामस्थांना ही मगर दिसल्यानंतर त्यांनी लातूर आणि उदगीर प्राणी मित्रांना बोलवलं. ग्रामस्थांनी वनविभागालाही या घटनेची माहिती दिली होती. मात्र ते वेळेवर न आल्यामुळे प्राणी मित्रांनी ही भली मोठी मगर मोठ्या जिद्दीने बाहेर काढली.  

८ फूट लांबीची मगर

जवळपास ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही १५० किलो वजनाची मगर बाहेर काढण्यात आली. जवळपास दोन वर्षांपासून ही मगर इथेच होती आढळून येत होती. मात्र मांजरा नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती काढणे शक्य झाले नाही. आता पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे प्राणी मित्रांनी ही मगर अखेर पकडलीच. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.