एनडीएत सहभागी नारायण राणे लढणार भाजपाविरोधात

 राणे यांना कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्ष एकवटले असले तरी राणेही कणवलीत तळ ठोकून आहेत.

Updated: Mar 30, 2018, 01:17 PM IST
एनडीएत सहभागी नारायण राणे लढणार भाजपाविरोधात  title=

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक यावेळी भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या सर्वांनीच प्रतिष्ठेची बनली आहे. नारायण राणेंचा बालेकिल्ला असला आणि राणे एनडीमध्ये सहभागी झाले असले तरी राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे.  संदेश पारकर यांच्या भाजपला शिवसेनेने साथ दिल्याचेही समोर आहे.  राणे यांना कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्ष एकवटले असले तरी राणेही कणवलीत तळ ठोकून आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी कणकवलीची निवडणूक महत्त्वाची असल्याने नितेश राणे आणि निलेश राणे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलीय.

चुरशीची लढाई 

शिवसेना आणि भाजपचे अन्यत्र विळ्याभोपळ्याचे नाते असले तरी इथ मात्र राणेमुळे विळ्याभोपळ्याची मोट बांधत शिवसेना भाजप एकत्र आलीय. अवघ्या पाच जागांच्या बदल्यात सेनेनं भाजपशी फार खळखळाट न करता युती करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.  चुरशीची लढाई असली तरी भाजपही सत्तेचे दावे करतेय.