Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव

Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Updated: Nov 29, 2022, 11:40 AM IST
Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव title=
Crime News Husband assaults wife and mother in law in property dispute and Sister in law assassination Thane badlapur nmp

Maharashtra Crime News : चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : मालमत्ताच्या वादातून (Property disputes) हत्येच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. असाच एक मालमत्तेच्या वादातून एक धक्कादायक घटना (Shocking incident) समोर आली आहे. पती-पत्नीच्या (husband and wife) भांडण्यात तिसऱ्याचा जीव गेला आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) मालमत्तेच्या वादातून पतीने पत्नीवर हल्ला केला. बहिणीला वाचविण्यासाठी दुसरी बहिण (sister) धावून आली मात्र नराधमाने मेव्हूणीचाच खून केला. 

एवढंच नाही तर या सासूवरही (mother in law) चाकूने वार केले. या घटनेत पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाल्या असून मेव्हुणीचा (sister-in-law)  जीव गेला आहे. पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं. 

बदलापूर गावातील जांभळा रोडला असलेल्या सनसेट हाईट इमारतीत फरीदा सय्यद आपल्या दोन लेकीसोबत म्हणजे निलोफर आणि सनोबर आणि नातवंडांसोबत राहतात. निलोफर हिचं लग्न झालं होतं. पण नवऱ्यासोबत सततच्या वादाला कंटाळून ती आईकडे राहिला आली होती. निलोफरचा नवरा काय मालमत्तेवरुन राडा घ्यालायचा. सोमवारी संध्याकाळी निलोफरचा नवरा मोहम्मद आयुब शेख सासरी आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो प्रॉपर्टीवर वाद घ्यालायला लागला. पण मोहम्मदने निरोफरवर धारदार शस्त्राने हल्ला केला. निरोफरला वाचविण्यासाठी बहिण आणि आई गेली असता त्यांच्यावरही या नराधमाने हल्ला केला. या हल्ल्यात त्याने मेव्हूणी सनोबर हिची हत्या केली. (Crime News Husband assaults wife and mother in law in property dispute and Sister in law assassination Thane  badlapur) 

या घटनेनंतर स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांच्या स्वाधिन केलं. दरम्यान निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.