धक्कादायक बातमी, एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी

Covid Positive Dead Body was found in Kalka Sainagar Express​ :आता एक धक्कादायक बातमी. कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Updated: Sep 3, 2022, 01:44 PM IST
धक्कादायक बातमी, एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी title=

अहमदनगर : Covid Positive Dead Body was found in Kalka Sainagar Express :आता एक धक्कादायक बातमी. कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री शिर्डी - साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना उघड झाली आहे.

कालका साईनगर एक्स्प्रेस साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर रात्री पोहोचली. त्यानंतर रेल्वेची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गाडीतील एका डब्यात बांधून ठेवलेली बॉडी दिसून आली. त्यांनी तात्काळ स्टेशन प्रशासनाशी संपर्क साधला. याची माहिती दिली. त्यानंतर पाहणी केल्यानंतर डेड बॉडी असल्याचे समाजले. धक्कादायक बाब म्हणजे ही कोविड पॉझिटिव्ह बॉडी होती. मात्र, रेल्वेमध्ये असे शव ठेवले कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अधिक चौकशीनंतर हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत ही बॉडी सापडली. महेंद्रसिंह बंबू (रा. हिमाचलप्रदेश) असे या व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले आहे.

दरम्यान, शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत पॉझिटिव्ह डेड बॉडी बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिर्डी नगरपालिका यांना घटनेची माहिती दिल्यावर ही बॉडी मयत असल्याची माहिती दिली. साईनगर शिर्डी रेल्वे पोलीस शिर्डी नगरपालिका शिर्डी पोलिसांच्यावतीने घटनेचा तपास सुरु आहे.