Kolhapur Election : का होतेय कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक? जाणून घ्या हे कारण

राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिलला मतदान झाले. आज मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल लागेल.

Updated: Apr 16, 2022, 10:01 AM IST
Kolhapur Election : का होतेय कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक? जाणून घ्या हे कारण title=

कोल्हापूर : राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिलला मतदान झाले. आज मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल लागेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे सर्वच महत्वाचे नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते.

कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil), राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) , गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि भाजप ( BJP ) दोघांनीही ही जागा प्रतिष्ठेची केलीय.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chadrakant Jadhv ) यांचे २ डिसेंबर २०२१ ला मध्यरात्री दोन वाजता कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाली तरी शहराच्या प्रत्येक प्रश्नात ते लक्ष घालत होते. त्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याच वेळी त्यांचा रक्तदाब कमी झाला. तो शेवटपर्यंत नियंत्रणात आला नाही आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

चंद्रकांत जाधव हे तसे भाजपचेच. कोल्हापूर महापालिकेत त्यांच्या पत्नी जयश्री ( Jayshree Jadhav ) आणि बंधू संभाजी ( Sambhaji jadhav ) हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते निवडूनही आले. 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता 1990 पासून या जागेवर कायम शिवसेना निवडून आली. 2014 मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर ( Rajesh Shirsagar ) यांनी काँग्रेसचे सत्यजित कदम ( Satyjit Kadam ) यांचा पराभव केला होता. त्याच राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत चंद्रकांत जाधव यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. मात्र, चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि या जागेसाठी पोटनिवडणूक लागली.