Coronavirus in Maharashtra : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढले आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. मृत व्यक्तीचं वय 69 वर्षे होते. या व्यक्तीला मूत्रपिंड आणि हृदयविकाराच्या त्रासासह उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांनी लसीची एकही मात्रा घेतली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे 3 हजार 874 सक्रिय रुग्ण आहेत. तर H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ‘एच३ एन२’ च्या रुग्णांची संख्या 384 झालीय. तसेच सध्या विविध रुग्णालयात 116 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरताना काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहेत. बुधवारी भारतात 4,435 नवीन कोविड-19 संसर्ग रुग्णांची नोंद झाली, ही 163 दिवसांतील (पाच महिने आणि 13 दिवसांची) सर्वात मोठा आकडा आहे, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्णांची संख्या 23,091 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी एकूण 4,777 रुग्ण दाखल झाले होते.
कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार आहे ज्यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत. दरम्यान, WHO ने हे देखील मान्य केले आहे की XBB.1.16 ने भारतात इतर प्रकार बदलले आहेत. WHO ने असेही म्हटले आहे की त्यांना 22 देशांमधून मिळालेल्या 800 सीक्वेन्सपैकी बहुतेक भारतातील आहेत.
वेगाने XBB 1.16 चा विस्तार होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, WHO अधिकाऱ्याच्या मते, 'XBB.1.16 व्हेरिएंट XBB.1.5 पेक्षा 140 टक्के वेगाने वाढतो, ज्यामुळे तो अधिक घातक आहे. XBB 1.16 ची लक्षणे ही बहुतेक कोरोना सारखीच असतात जसे की थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, नाक वाहणे आणि खोकला इ. याशिवाय काही लोकांना ओटीपोटात दुखणे, अस्वस्थता आणि जुलाबाचीही तक्रार असू शकते.
ज्या लोकांना लसीकरण झाले आहे त्यांना देखील संसर्ग होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचे सब-वेरियंट XBB.1.16 देखील लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संसर्ग होऊ शकते. ज्या लोकांना जास्त धोका आहे ते
वृद्ध लोक किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, हृदयविकार आणि कोरोनरी धमनी रोग आणि मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक, फुफ्फुस, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार असलेले लोक, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ज्यांना कोरोनाची लस मिळालेली नाही, त्यांना धोका आहे.