Crime News: I Love You... म्हणत महिलेची छेड काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी असा धडा शिकवला की...

Crime News: संभाजीनगरमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी चागंलाच धडा शिकवला. परभणीतही (Parbhani) रोड रोमियोला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Updated: Apr 5, 2023, 10:53 PM IST
Crime News: I Love You... म्हणत महिलेची छेड काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी असा धडा शिकवला की... title=

Crime News: एखाद्या महिलेची किंवा मुलीची छेड काढाल तर याद राखा.. कारण ही छेड काढणं महागात पडू शकतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) मयूरबन कॉलनीत एका पोलीस उपनिरिक्षकाने दारुच्या नशेत महिलेची छेड काढली. I Love You... म्हणत महिलेची छेड काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. तर परभणीतही (Parbhani) रोड रोमियोला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे (Crime News).

दारूच्या नशेत शहरातील मयूरबन कॉलनीत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने दीड महिन्यातच पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढली. आधी आय लव्ह यू म्हणून निघून गेलेल्या बोडलेने पुन्हा बुलेटवरून येत थेट महिलेचा हात धरला. हा प्रकार कॉलनीवासियांना समजल्यावर त्यांनी बोडलेला बेदम चोप दिला आहे. महिलेची छेड काढणा-या या पोलिसाची झिंग जमावाने चांगलीच उतरवली. पोलिसाला चोपल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोड रोमियोला जमावाकडून बेदम मारहाण

परभणीच्या सेलू येथील मुलीची बस प्रवासा दरम्यान छेड काढणाऱ्या रोमियोस जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना सेलू बसस्थानकात घडली आहे. मारहाणीत अर्धनग्न झालेल्या सदरील तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सेलू येथून (बस क्रमांक एमएच 20 बीएल 3050) ही बस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाथरीच्या दिशेने जात होती. 

यात दोन मुली प्रवास करत होत्या. दरम्यान, याच बसमध्ये इम्रान वसीमोद्दीन फारोखी (वय 34 वर्ष, रा. पाथरी) हा तरुण देखील प्रवास करत होता. बस सदरील तरुण इम्रान वसीमोद्दीन फारोखी याने बसमधील त्या दोन मुलींपैकी एका मुलीची छेड काढली. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. बसचा ड्रायव्हर राऊत आणि कंडक्टर विष्णू कुमकर्ण यांनी सेलू बसस्थानक येथील वाहतुक नियंत्रक वसंत बोराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बस पुन्हा सेलू आगारात घेऊन येण्यास सांगितले. यावरुन बस पुन्हा सेलू बसस्थानकात नेण्यात आली. याचवेळी सदरील तरुण बसमधून खाली उतरताच तेथील नागरिकांनी त्या रोमियोला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती पोलीसांना कळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तरुणास जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. पोलीसांनी सदरील तरुणांसह मुलींना देखील पोलीस ठाण्यात नेले.