आता नाशिक जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड विरुद्धची लढाई तीव्र करण्यावर भर देण्यात येत आहे.  

Updated: May 24, 2021, 01:18 PM IST
आता नाशिक जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी title=
संग्रहित छाया

 नाशिक : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड विरुद्धची लढाई तीव्र करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. आता नाशिक (Nashik) जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 खासगी रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण होणार आहे, याबाबत नाशिक महापालिकेडून ही परवानगी देण्यात आली आहे. (Permission to Covid Vaccination in Private Hospital At Nashik )

मुंबई पाठोपाठ आता नाशिकलामध्ये खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण होणार असल्याने लसीकरणाला वेग येणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयाला मनपाची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आता 14 खासगी रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण हे होणार आहे.

रेडियन प्लस, साई सिद्धी, सुविचार, मयूर, सायखेडकर, सुश्रुषा, प्रसन्न , मॅग्नम, गंगा ,साफल्य, नव संजीवनी , नेम्स, मानवता कॅन्सर ,  चिरंजीव , कृष्णा , बिरला , अरिहंत, अंतरा, तुळशी , सप्तशृंगी या 14 रुग्णालयात लसीकरण होणार आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, परिस्थिती थोडी खाली आल्याने आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांना काही अटींसह सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करता येणार आहे.