मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये काही दिवसांपासून घट होऊ लागली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांमध्ये जवळपास अर्ध्याने संख्या कमी झाली आहे. गेल्या महिन्यात दररोज 70 हजारांनी वाढणार संख्या आता 30 हजारांवर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे. पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) वाढणार का ? असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. (Lockdown in Maharashtra)
राज्यातील अनेक भागात कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) झाला. अनेक ठिकाणी अजूनही कहर सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Wave) मोठा फटका बसला. अनेकांनी जीव गमवले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पसरला. त्यामुळे संकट वाढलं. अजूनही संकट टळलेलं नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की, 1 जूनपासून टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल केले जातील.' पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं ही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 'राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात कटूपणा घेण्याचीही तयारी आहे.' असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
टास्क फोर्समधील डॉक्टरांसोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. 'नागरिकांनी सहकार्य केलं. पण अजूनही यश मिळालेलं नाहीये.' असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.