कोरोनाचे सावट : औरंगाबादमध्ये बाधित महिला फिरतेय खुलेआम, भीतीचे वातावरण

कोरोनाची बाधा झालेली एक महिला गेले आठवडाभर औरंगाबाद शहरात फिरतेय.

Updated: Mar 18, 2020, 01:41 PM IST
कोरोनाचे सावट : औरंगाबादमध्ये बाधित महिला फिरतेय खुलेआम, भीतीचे वातावरण title=

औरंगाबाद : कोरोनाची बाधा झालेली एक महिला गेले आठवडाभर औरंगाबाद शहरात फिरत होती. कॉलेजमध्ये तीने क्लासेसही घेतले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याचे चित्र आहे. यावरच मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

सोशल डिस्टन्स म्हणजे, कोणाशी बोलतांना, भेटतांना किमान एक मीटर अंतर दोघांमध्ये असावे. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कार्यक्रमात सहभागी होऊ नये, स्वच्छता नियमांचे पालन करावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातच नेले नाही

दरम्यान, नागपूरमध्ये एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. रुग्णालयाच्या परिसरात गेलो तर कोरोना होईल, या धास्तीने विषप्राशन केलेल्या एका तरुणाला रुग्णालयातच नेले नाही.  जुनी मंगळवारी या परिसरात ही घटना घडली. या तरुणाला रुग्णालयात दाखल केले  नाही. त्याच्यावर उपचार न झाल्याने विषप्राशन केलेल्या या तरुणाचा मृत्यू झाला.  या तरुणाला वेळीच रुग्णालयात नेले असते तर हीच दुर्घटना टळली असती, असा दावा त्याच्या पत्नीने केला आहे.

0