कोरोनाबाधित महिलेचा कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग

महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Updated: Mar 1, 2021, 08:47 PM IST
कोरोनाबाधित महिलेचा कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग title=

कल्याण : आर्ट गॅलरी इथल्या कोविड रूग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. रूग्णालयातल्या वॉर्डबॉयनंच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीकांत मोहिते असं वॉर्डबॉयचं नाव आहे. बाजारपेठ पोलिसांनी श्रीकांत मोहितेला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

उपचारासाठी आलेल्या कोविड पॉझिटिव्ह महिलेचा कोविड सेंटरमधील वॉर्डबॉयनेच विनयभंग केला. याआधी देखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 

कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर कल्याणमधील हे कोविड सेंटर बंद करण्यात आलं होतं. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ते पुन्हा सुरु करण्यात आलं. याच कोविड सेंटरमध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. महिलेचा विनयभंग झाल्याने तिने ही गोष्ट महिला डॉक्टांना सांगितली. त्यानंतर ही घटना समोर आली. 

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने महिलांच्या कोविड सेंटरमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी महिला वॉर्डबॉय का नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.