मुंबई : राज्यात 24 तासांत 68 हजार 631 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 654 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून. प्रत्येकाने खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
Maharashtra reports 68,631 fresh COVID cases, 45,654 discharges, and 503 deaths in the last 24 hours
Active cases: 6,70,388
Total discharges: 31,06,828
Death toll: 60,473 pic.twitter.com/XqWJytNf0x— ANI (@ANI) April 18, 2021
तर मुंबईत आज 8 हजार 479 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 53 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.
Mumbai reports 8479 new #COVID19 positive cases and 53 deaths, in the last 24 hours.
Active cases: 87698
Death toll: 12347 pic.twitter.com/wa7QG9oqR7— ANI (@ANI) April 18, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1 हजार 475 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 310 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 219 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.