औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः तारे तोडले. ते खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली आहेत. माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते, असा दावा खैरे यांनी केला.
माझ्याकडं डॉक्टरची डिग्री नाही. पण मी अनेक लोकांना बरं केलंय... माझ्या पुडीनं आणि जपानं रुग्ण बरे होतात. त्यामुळं मी रुग्णालयात लोकांना भेटायला जातो, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजित आरोग्य मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी ही खळबळजनक वक्तव्यं केली. शिवसेनेच्या खासदारांचे हे बोल ऐकून उपस्थित असलेले सर्वच थक्क झाले होते.