सचिन कसबे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (former NCP MLA Rajan Patil)यांच्या एका वक्तव्यामुळे(Controversial statement) एकच खळबळ उडाली आहे. राजन पाटील यांनी अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य केले आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात असं राजन पाटील यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होऊ शकतो(Maharashtra Politics).
राजन पाटील हे राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत राजन पाटील बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांची जीभ घसरली. पाटलांच्या पोरांना लग्ना आधीच पोर होतात असं वक्तव्य त्यांनी केले. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आव्हान दिले आहे.
आज एका प्रचार सभेत माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आम्ही पाटील आहोत आणि पाटलांच्या पोरांना लग्ना आधी पोर होतात अस वक्तव्य त्यांनी केले. टीका करताना माजी आमदार पाटील यांनी पातळी सोडली.
आमच्या पोरांना भीती दाखवू नका. वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम आमच्या पोरांनी भोगली आहेत. असे म्हणत माजी आमदार पाटील यांनी मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच समर्थन देखील केलं आहे.