Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल

गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

Updated: Nov 12, 2022, 02:36 PM IST
Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल  title=

pune: गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

मात्र याचा राग आल्यास दुचाकीस्वारानं शिवीगाळ करत बस चालकाला मारहाण केलीय. यावेळी सदर ठिकाणी हजर असलेल्या प्रवाशांनी हा घटनेचा व्हिडिओ काढलाय. 

याप्रकरणी पिंपरी पोलिसा स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.मारहाण झालेले बस चालक सूर्यकांत कांबळे हे पिंपरी नेहरूनगर मार्गावर आपले कर्तव्य बजावत होते तेव्हा डाव्या बाजूने चाललेल्या ऋषीकेशला सूर्यकांत यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

यामुळे राग अनावर झालेल्या ऋषीकेशने बस थांबवून थेट सूर्यकांत यांच्या कानशिलात लगावत मारहाण केली. मी कोण आहे माहिती आहे का? 

अस म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसात सूर्यकांत यांनी तक्रार दिली असून आरोपी ऋषीकेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत