'घाटकोपरमधल्या बेपत्ता मुलींच्या प्रकरणांत राम कदम यांची चौकशी करा'

भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. 

Updated: Sep 6, 2018, 10:05 AM IST
'घाटकोपरमधल्या बेपत्ता मुलींच्या प्रकरणांत राम कदम यांची चौकशी करा' title=

पुणे : भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. राम कदम हे कायदेमंडळाचे सदस्य असताना त्यांनी कायद्याचा भंग केलाय. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असा अर्ज मानवी हक्क संस्थेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केलाय. इतकच नाही तर राज्यात ३००० पेक्षा जास्त मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी आहेत. त्यापैकी घाटकोपर विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातल्या जेवढ्या मुली बेपत्ता आहेत, त्याप्रकरणी कदम यांची चौकशी व्हावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय.