मुख्यमंत्र्यांच्या रस्त्यावर शिवसैनिकांचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण

50 खोके, एकदम ओकेच्य, शिवसैनिकांची घोषणाबाजी... ठाकरे गट - शिंदे गट आमने सामने

Updated: Sep 12, 2022, 05:49 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या रस्त्यावर शिवसैनिकांचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण title=

संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांची पैठण इथं जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांचा हा मतदार संघ आहे. पैठण (Paithan) दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून विमानतळ ते सभास्थळापर्यंत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सभास्थळी 9 ते 10 हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. बिडकीनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून निषेध केला. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय. तसंच शिवसैनिकांनी 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या. यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. 

सभेला येण्यासाठी 250 रूपयांचं वाटप?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (12 सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत.  संभाजीनगरच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु असताना कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या  कार्यकर्त्यांची एक Audio Clip Viral झाली आहे. (viral phone recording of paying money to gather crowd at cm eknath shinde sabha sandeepan bhumare )

या Audio Clip मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्याचे असे देखील ऑडिओ क्लीपमध्ये (Audio Clip) संभाषण आहे. ही ऑडिओ क्लीप (Audio Clip) कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याची झी २४ तास पुष्टी करत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.