मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी

हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 11 जानेवारीला PM Narendra Modi यांच्या हस्ते लोकापर्ण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Updated: Dec 4, 2022, 02:31 PM IST
मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी आज समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी केली. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यापासून त्यांनी पाहणी सुरु केली. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ज्या वेगाने राज्याचा विकास होत आहे त्याच वेगाने शिर्डीपर्यंतचा प्रवास सुसाट होईल अशी प्रतिक्रिया या दोघांनी यावेळी दिली.

11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 जानेवारीला हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी नागपूरमध्ये दाखल झाले. समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी सुरु केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा लक्षात घेऊन कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ या गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली. कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांनी काही सूचना केल्या. 

701 किमीचा समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण 120 मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.