CIDCO Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कामाची बातमी आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
सिडकोमध्ये विविध पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इंटर्नल असिस्टंट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्यांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना एस-15 नुसार 41 हजार 800 रुपये ते 1 लाख 32 हजार 300 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
इंटर्नल असिस्टंट इंजिनीअर पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी बातमीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्ज करता येणार आहे.
या पदासाठी 19 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
सिडकोमध्ये अकाऊंट क्लर्कच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा.सिडको अकाऊंट क्लर्क पदासाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. लेखा लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एस-8 नुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.