Chennai ECR beach Striking bioluminescent waves : पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे. आपल्या भारतात हा स्वर्गीय नजारा पहायला मिळत आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंधारात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या रहस्यमयी लाटा उसळल्या आहेत. चमकणाऱ्या लाटा हा एक नैसर्गिक चमत्कार नसून वैज्ञानिक चमत्कार असल्याचे संशोधक सांगतात. आहे. या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तामिळनाडूतील चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर या निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईतील नीलंकराई, इंजांबक्कम, विल्लुपुरम आणि मारक्कनम समुद्रकिनाऱ्यांवर या लाटा पहायला मिळत आहेत. या निळ्या रंगाच्या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहे. या लाटा पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
Just now enjoyed the mesmerising Fluorescent waves at ECR beach!! #Bioluminescence pic.twitter.com/6ljfmlpyRO
— Dr ANBUMANI RAMADOSS (@draramadoss) October 18, 2024
समुद्रात उसळणाऱ्या या निळ्या रंगाच्या लाटा एक नैसर्गिक बदल आहे. समुद्रात उसळणाऱ्या या निळ्या रंगाच्या लाटा सी घोस्ट, सी फायर आणि सी स्पार्कल या नावाने देखील ओळखल्या जातात. समुद्रात होणाऱ्या या रंग बदलाला वैज्ञानिक भाषेत 'बायोल्युमिनेसन्स' असे म्हणतात. 'ल्युमिनस' म्हणजे चमकणे आणि 'जैव' म्हणजे जीवन. महासागरात निर्माण होणारा निळा रंग हा जीवजंतूंनी निर्माण केलेला फ्लोरोसेंट प्रकाश आहे. फायरफ्लाय किंवा गोल्डन बीटलप्रमाणे, समुद्रातील अनेक मासे बायोल्युमिनेसेंट असतात. असे हजारो सूक्ष्मजीव समुद्रात आहेत. यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु रात्रीच्या वेळेस अंधारात हे जीव चमकताना दिसतात..