अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 2, 2023, 02:28 PM IST
अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र title=

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

महत्वाचे मुद्दे 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अजित पवार राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.