चंद्रपुरात वाघाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडणंही ठरू शकतं धोक्याचं सावधान कारण बाहेर फिरतोय वाघ

Updated: Feb 15, 2022, 07:42 PM IST
चंद्रपुरात वाघाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण title=

आशीष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये पहाटेच्या सुमारास वाघाचं दर्शन झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. 

या भागात कार्यरत कामगारांना वाघाचे दर्शन झाले. या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे मार्ग जातो. वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव कामगारांसाठी धोकादायक ठरत आहेत. 

या समस्येवर वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाघाचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.