नगरसेविकेच्या निधनाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला फटका, शिवसेनेचा विजय

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकसान सहन करावे लागले आहे.

Updated: Feb 15, 2022, 07:26 PM IST
नगरसेविकेच्या निधनाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला फटका, शिवसेनेचा विजय title=

नाशिक : बहुचर्चित सुरगाणा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे शिवसेनेचे भरत वाघमारे विजयी झाले. उपनगराध्यक्ष निवडीतही चिठ्ठीद्वारे माकपच्या माधवी थोरात यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

भाजपच्या नगरसेविका कासुबाई पवार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वापी येथे सहलीसाठी गेल्या असताना त्यांचं निधन झालं. त्यामुळे नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत पेच तयार झाला होता. 

दोन्ही बाजूला नगरसेवक संख्या समान झाल्याने नगराध्यक्ष कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजप - राष्ट्रवादी व शिवसेना यांची सदस्य संख्या समान झाली होती. त्यामुळे 2 नगरसेवक असलेला माकप किंगमेकर ठरला.

सुरगाणा नगरपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 8 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. दुसरीकडे शिवसेनेने 6 तर राष्ट्रवादीने 1 आणि माकपाला 2 जागा मिळाल्या होत्या.