शरद पवार यांच्याबाबत 'एकेरी', चंद्रकांत पाटील यांची सारवासारव

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली होती.  

Updated: Oct 19, 2021, 01:54 PM IST
शरद पवार यांच्याबाबत 'एकेरी', चंद्रकांत पाटील यांची सारवासारव title=

मुंबई : Chandrakant Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली होती. यावरुन त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांच्याबाबत चुकीने बोललो, बाऊ कशाला, करता असे म्हटले आहे. (Chandrakant Patil's explanation after the single criticism on Sharad Pawar)

शरद पवार यांच्याबाबत चुकीने बोललो असल्याची कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. एका कार्यकर्त्याच्या खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमात मी बोललो. स्लिप ऑफ टंग झाले, असे पाटील म्हणाले. शरद पवार यांच्याबाबत आदर आहे. त्यांच्याबाबत अनेकदा चांगले बोललो ते ढीगभर आहे. पण एकदा चुकून बोललो त्याचा एव्हढा बाऊ करायची गरज काय, असे पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते पाटील?

 सांगलीमधील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना एकेरी उल्लेख केला होता. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला. राज्यात शरद पवार यांचे आपल्याला आव्हान नाही, कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेले पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. सांगली मध्ये भाजपा पदाधिकारी बैठकी वेळी पाटील हे बोलत होते. 

दरम्यान, भाजपच्या टीकेवर बोलायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावे. संजय राऊत का बोलतात, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.