Chandrakant Patil: भाजपचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर (Ink Attack On Chandrakant Patil) शनिवार पुण्यात शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर आणि पत्रकारांना निशाण्यावर घेतलं. कालपासून चंद्रकांत पाटलांचा संताप पहायला मिळत असतानाच आता, शाईफेक प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांनी गंभीर आरोप केले (Chandrakant Patil serious allegations) आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. (Chandrakant Patil serious allegations Was there a plan to finish me Maharastra Politics marathi news)
माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का? मला मारायचा प्लॅन होता का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे. निषेधाची ही पद्धत कोणती असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर 11 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आलं. त्यावरून अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
मला चंद्रकांत पाटील यांना अजिबात चॅलेंज द्यायचं नाही. चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे चूक होतं, असं अजित पवार म्हणाले. कारवाई जरुर करावी. पण कोणावरही अन्याय होऊ नये. निष्पाप व्यक्तींवर कारवाई होता कामा नये, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी यांनी प्रत्युत्तर दिलंय. दुसरीकडे राजकीय दबावातून आरोपींवर गुन्हाचा गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात वाकयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.