औरंगाबाद : जे शेतकरी कर्ज माफिचा अर्ज भरू शकले नाहीत त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज करण्याची संधी देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे.
जे शेतकरी कर्जमाफीचा प्रोसेस मधून बाजूला काढले असतील, सिस्टीममधून चुकीनं बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी देखील राज्यशासनाने एक कमीटी नेमली आहे. ती कमीटी त्या शेतक-यांशी संवाद साधेल आणि त्यांच्यावर देखील अन्याय झाला असेल तर त्यांना कर्जमाफीचा फायदा देणार असल्याचं चंद्रकांत दादा यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबदेत भाजपा युवा मोर्चाच्या युवा मेळाव्यात बोलत होते.