मिरजजवळ चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती

बंगळुरु-गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झालीय. 

Updated: Dec 25, 2017, 09:07 PM IST
मिरजजवळ चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती  title=

मिरज : बंगळुरु-गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झालीय. अत्ताबेन हटेला असं या महिलेचं नाव आहे. सांगलीतल्या मिरज रेल्वे स्टेशनवर ही घटना घडलीय.

अत्ताबेन आणि राकेश हे हुबळीहून गुजरातमधील बडोदा इथं आपल्या गावी जात होते. त्यावेळी रेल्वे मिरज स्टेशनवर आली असताना गर्भवती असणा-या अत्ताबेन यांना प्रसूतीवेदना सुरु झाल्या. याची माहिती मिळताच मिरज लोहमार्गाच्या महिला पोलीस या महिलेच्या मदतीला धावल्या.

स्टेशनवर कुणी डॉक्टर आहे का अशी विचारणा स्पीकरच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी स्टेशनवर असणा-या डॉ. क्षितिजा देसाई स्टेशनवरच उपस्थित होत्या. जनरल डब्ब्यात धाव घेत तिथेच महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. सुखरुप प्रसूती होत नाही तोवर ही ट्रेन स्टेशनवरच थांबून होती.

डॉ. क्षितीजा यांच्या उपस्थितीत अत्ताबेन यांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर अत्ताबेन आणि नवजात बालकाला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.