अब्दुल सत्तार म्हणतात, आदित्य ठाकरे पप्पू क्रमांक 2; चंद्रकांत खैरे म्हणाले, हिरवा साप आता...

आदित्य ठाकरे गोदडीत होतो तेव्हा मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करत होतो, असेही अब्दुल सत्तार म्हणाले

Updated: Oct 28, 2022, 02:50 PM IST
अब्दुल सत्तार म्हणतात, आदित्य ठाकरे पप्पू क्रमांक 2; चंद्रकांत खैरे म्हणाले, हिरवा साप आता... title=

राज्यातील सत्तातरानंतर विरोधकांकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) सरकारवर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. यावरुनच शिंदे गटातील आमदारही आक्रमक झाले आहेत. शिंदे गटातील आमदार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू नंबर दोन असा उल्लेख केला आहे. आदित्य ठाकरे पप्पू क्रमांक दोन आहेत असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. (Chandrakant Khaire reply to Abdul Sattar criticizing Aditya Thackeray)

"मी त्यांना पप्पू क्रमांक दोन म्हणालो. जेव्हा आदित्य ठाकरे गोदडीत होतो तेव्हा मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करत होतो. त्यांना यांची जाणीव नाहीये. जाणीव असती तर मागच्या अडीच वर्षात बरच काही झालं असतं. शंभर दिवसात आम्ही जे काम केलं त्या कामामुळे लोकांमध्ये समाधान आहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी किती पैसे दिला आणि या सरकारने किती दिले हे बघा," असे अब्दुल सत्तार म्हणाले.

यानंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. 

सत्तार भाजपमध्ये आले त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात घेण्यास विरोध केला. तुम्ही आमच्याकडे त्यांना ढकललं. त्याबदल्यात आम्हाला एक जागा अधिकची दिली. उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वीकारलं आणि निवडूनही आणलं. एवढं झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात तो हिरवा साप आहे. अब्दुल सत्तार सापच नाही तर रंग बदलणारा सरडा आहे. माझ्या या विधानाशी मुस्लिम बांधवही सहमत आहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी टीका केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. मी त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले. पप्पू टप्पू काय म्हणायचंय ते म्हणा, माझी मजा उडवा. पण शेतकऱ्यांच्या बांधावर जा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.