मुंबई : सोशल मीडियावर सध्या हा फोटो खूप धुमाकूळ घालत आहे. या फोटोतून तु्म्हाला बिबट्या शोधून काढण्यासा टास्क सध्या सगळ्यांना दिला जात आहे. शुक्रवारी बेला लॅक (Bella Lack) या ट्विटर युझरने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तुम्हाला बिबट्या शोधून काढायचा आहे आणि त्याकरता तुम्हाला सुक्ष्मदर्शिकाच घ्यावी लागेल यात शंकाच नाही.
तिने ट्विटरवर लिहिलं आहे की, हा फोटो कुणा दुसऱ्याकडून आला आहे. बेला देखील या फोटोत बिबट्या शोधत होती. नंतर तिला वाटलं की, कुणी तरी तिची मस्करी करत आहे. पण भरपूर शोधल्यानंतर या फोटोत दडलेला बिबट्या तिला दिसला. पिवळ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असलेला बिबट्या या फोटोत तुम्हाला सहज दिसणार नाही. त्यामुळे फोटो बघून नक्की बिबट्या कुठे आहे? हा प्रश्न तुम्हाला पडेल. आता बेलाने हा फोटो शेअर करून तुम्हाला बिबट्या सापडतोय का? बघा असा प्रश्न केला आहे.
Someone just sent this to me and asked me to find the leopard. I was convinced it was a joke... until I found the leopard. Can you spot it? pic.twitter.com/hm8ASroFAo
— Bella Lack (@BellaLack) September 27, 2019
या फोटोला इतके रिट्विटर करण्यात आले आहे. तसेच हजारो युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोडक्यात काय या फोटोने नेटिझन्सना अक्षरशः वेड लावलं आहे.
Nope, lil help please!?
— “BringItBack.......” (@ter0424) September 27, 2019
Took me about 5 minutes!! Well hidden.. more of this please
— Stephanie Barlow (@teambarlow10) September 27, 2019
Good camouflage pic.twitter.com/T88dg9Gzzj
— (@MJMcCune) September 27, 2019
Spoiler Alert. What amazing camouflage though. pic.twitter.com/kIxcxHDU1k
— Niamh (@NiamhLQB) September 27, 2019
Took me just few seconds. pic.twitter.com/fXbEQLLHOt
— Foodenix (@foodenix) September 29, 2019
काही युझर्सनी अक्षरशः या फोटोचा किस पाडून बिबट्याला शोधून काढलं आहे. काहींनी बिबट्याला शोधून त्याला मार्क किंवा गोल करून सगळ्यांना कळावं म्हणून अधोरेखित केलं आहे. तुम्ही देखील प्रयत्न करा हा बिबट्या शोधण्याचा.