Cabinet Minister Post For 100 Crores: 100 कोटींच्या मोबदल्यात कॅबिनेट मंत्रीपद देतो; 5 BJP आमदारांना फोन आला अन्...

Cabinet Minister Post For 100 Crores: भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 100 कोटींच्या मोबदल्यात मंत्रीपदाची ऑफर देणाऱ्या या व्यक्तीच्या फोन कॉल डिटेल्समधून सापडलेल्या क्रमांकामध्ये पाच आमदारांचे फोन नंबर आहेत.

Updated: Feb 9, 2023, 09:09 PM IST
Cabinet Minister Post For 100 Crores: 100 कोटींच्या मोबदल्यात कॅबिनेट मंत्रीपद देतो; 5 BJP आमदारांना फोन आला अन्... title=
100 Crore for Cabinet Minister Post

Cabinet Minister Post For 100 Crores: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर कॅबिनेट मंत्रीपदाच्या मोबदल्यात 100 कोटींची मागणी करण्यात आल्याच्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्तांतरणानंतर थेट आमदारांचा 100 कोटींच्या मोबदल्यात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देणाऱ्या आरोपीच्या कॉल डिटेल रिपोर्ट म्हणजेच सीडीआरमधून त्याने कोणकोणत्या आमदारांशी संपर्क साधला होता हे तपास यंत्रणांच्या हाती लागलं आहे.

जूनमध्ये सत्तापालट

महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर स्वपक्षाविरोधात बंड पुकारलं. त्यानंतर दोन आठवडे चालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसहीत महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बरेच दिवस मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला होता. याच कालावधीमध्ये रियाज शेख नावाच्या व्यक्तीने भाजपाच्या काही आमदारांशी संपर्क साधला होता. 100 कोटींच्या मोबदल्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देतो अशी ऑफरच शेखने दिली होती. 

पाच जणांचे क्रमांक सापडले

या प्रकरणात एका भाजपा आमदाराच्या तक्रारीनंतर रियाज शेख या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. शेखच्या मोबाईल डिटेल्सवरुन त्याने कोणाशी संपर्क साधला होता याची माहिती काढण्यात आली असता त्यामध्ये भाजपाच्या पाच आमदारांचे फोन नंबर सापडले आहेत. त्यामुळेच कॅबिनेट मंत्रीपदाच्या मोबदल्यात 100 कोटी मागण्यासाठी आरोपीने पाच आमदारांशी संपर्क साधला होता हे स्पष्ट झालं आहे.

या आमदाराच्या तक्रारीनंतर कारवाई

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर 100 कोटींच्या मोबदल्यात पाच आमदारांना मंत्रीपद देण्याचं आश्वासन आरोपी शेखनं दिलं होतं. या आरोपीचा फोन आल्यानंतर भाजपा आमदार राहुल कुल यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील केली. या तक्रारीची दाखल घेत मंत्रीपदाची ऑफर देणाऱ्याला या ठगाला पोलिसांनी अटक केली. 

सहकारमंत्र्यांनाही फोन

भाजपाच्या पाच ज्या पाच आमदारांना या आरोपीन फोन केला होता त्यामध्ये तक्रारदार आमदार राहुल कुल यांच्याबरोबरच  सुभाष देशमुखांना, समाधान आवताडे, सुरेश धस आणि आतुल सावे यांचा समावेश आहे. याच पाच आमदारांचे फोन नंबर या आरोपीच्या सीडीआर रिपोर्टमध्ये सापडले आहेत. या पाच आमदारांशी आरोपीने संपर्क साधून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली होती. या पाचही आमदारांशी संपर्क साधल्याचा जबाब या आरोपीने नोंदवला आहे. विशेष म्हणजे यापैकी अतुल सावे हे राज्याचे विद्यमान सहकारमंत्री आहेत.