Aaditya Thackeray In Aurangabad: युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिवसंवाद' यात्रेचा (Shiv samvad Yatra) सातवा टप्पा सोमवारी नाशिकमधून (Nashik) सुरु झाला आहे. त्यानंतर आता ते मराठवाड्यात आहेत. गावोगावी भेट देण्यास सुरूवात केल्याने शिंदे गटाचे आमदार डोळ्यात तेल घालून मतदार संघ वाचवण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray Look) लूक या यात्रेवेळी खास ठरतोय.
मराठवाडा दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे अनेक प्रश्नांच्या उत्तराला समोरे गेले आहेत. अनेक पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना खासगी प्रश्न देखील विचारले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरं दिली. आदित्य ठाकरेंचा लुक चर्चेत आहे, तो निळ्या शर्टमुळे (Aaditya Thackeray Blue Shirt). अनेकवेळा ते निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पोशाखामध्ये दिसलेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्टाईलविषयी उत्सुकता निर्माण झालीये. त्यावर त्यांनी प्रश्न विचारण्यात आला.
तुम्ही रोज 'ब्ल्यू शर्ट' का घातला? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हसत हसत उत्तर दिलंय. सकाळी उठल्यावर विचार करावा लागत नाही. रोज गडबड असते, असं आदित्य ठाकरे म्हणतात. रोज काय घालायचं हा प्रश्न पडत नाही. बाकी काही कारण नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
आणखी वाचा - Bachchu Kadu Big Claim: शिंदे सरकार अडचणीत? बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ
दरम्यान, मला आई (Aaditya Thackeray Mother) पण ओरडत होती की जरा वेगळ्या रंगाचे कपडे घाल, असा किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला. औरंगाबाद (Aurangabad) येथील वैजापूर तालूक्यातील महालगावी येथे आदित्य ठाकरेंच्या सभेत काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मोठा वाद देखील पेटला होता. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे.