मेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...

पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे.  मेव्हण्याने  एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.      

Updated: Jul 17, 2023, 04:41 PM IST
मेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...  title=

Pune Crime News : एका बुक्कीत चार दात पाडेण असं म्हंटल जाते. पुण्यात मात्र, हे प्रत्यक्षात घडलं आहे.  आरोपीने मेव्हण्याचे एका बुक्कीतचं चार दात पाडले आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे, आरोपीहा तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीचा भाऊ आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून  आरोपीने मारहाण केल्याचे समजते.  

पुण्यातील अलकॉन रिटो सोसायटी घोरपडी येथे ही घटना घडली आहे. सयाजी साहेबराव बोरसे (वय - 46 रा. डिफेन्स कॉलनी कॉर्टर लुल्लानगर वानवडी ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात पत्नीच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सयाजी यांच्या पत्नी मनीषा यांचा भाऊ जितेंद्र देविदास पाटील (वय- 45 वर्ष रा. अलकॉन रिटो सोसायटी घोरपडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

मेव्हणा आणि भावोजी यांच्यात वाद

कौटुंबिक वादातून आरोपी जितेंद्र याने सयाजी यांच्या मुलाला फोनवरून शिवीगाळ दिली. यामुळे बोरसे हे त्यांची पत्नी आणि मुलगा रोहित याच्यासह आरोपी जितेंद्र पाटील याच्या राहत्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी आरोपी जितेंद्र पाटील याने  बोरसे यांचा मुलगा रोहित याला मारहाण केली. तसेच सयाजी बोरसे यांच्या तोंडावर बुक्की मारून त्यांचे चार दात पाडले.

जखमी भावोजीवर रुग्णालयात उपचार सुरु

यामध्ये जखमी झालेले बोरसे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत आरोपी जितेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे.  असून याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

पुण्यात तब्बल 105 आयफोनवर डल्ला 

पुण्यात तब्बल 105 आयफोनवर डल्ला मारण्यात आला आहे. आयफोनच्या वेअर हाऊसमध्ये ही चोरी झाली आहे. कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन कंपनीचे सिमा वेअर हाऊसमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने याबाबत तक्रार दिली आहे.  15 जुलै रोजी सुरक्षा रक्षक वेअर हाऊस बंद करून निघून गेले.  रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा फोडुन गोदामात प्रवेश केला. 65 लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे 105 आयफोन चोरले आहेत.  आयफोन 13, आयफोन 14, आयफोन 14 प्रो या मॉडेलचे वेगवेगळ्या रंगाचे आयफोन लंपास केले आहेत.