भाजपचा विजय, महाविकासआघाडीला मोठी चपराक - फडणवीस

Legislative Council Election Results​ : अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. 

Updated: Dec 14, 2021, 12:11 PM IST
भाजपचा विजय, महाविकासआघाडीला मोठी चपराक - फडणवीस title=
संग्रहित छाया

नागपूर :  Legislative Council Election Results : अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे महाविकासआघाडीला मोठी चपराक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. आता विजयाच्या मालिकेची सुरुवात झाली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (BJP's victory, a big slap  Maha Vikas Aaghadi - Devendra Fadnavis)

अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांना 438 मत तर महाविकास आघाडीच्या गोपिकीशन बाजोरिया यांना 330 मते पडली. 38 मध्ये सध्या विवादित आहेत. विजयासाठी 405 मतांची गरज होती. त्यामुळे भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांनी तीन वेळा विधान परिषदेचे आमदार असलेले गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला आहे. बाजोरिया हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. ते शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.

विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवत विधानपरिषदेत एंट्री केली. बावनकुळे यांनी 362 मते घेतली तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांना 186 मते पडली. विशेष म्हणजे भाजपची 318 मतं असताना त्यांना 362 मते मिळाली. त्यामुळे  महाविकास आघाडीची 44 मतं फुटल्याचा दावा भाजपने केला आहे. उमेदवार बदलाचा फटका काँग्रेसला बसला.