मिरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

महापौरपदावर भाजपच्या डिंपल मेहता तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे.

Updated: Aug 28, 2017, 08:30 PM IST
मिरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता title=

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आलीय. महापौरपदावर भाजपच्या डिंपल मेहता तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे.

डिंपल मेहता यांनी शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव केला. मेहता यांना ६१ तर पाटील यांना ३४ मतं मिळाली. तर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत वैती यांनी काँग्रेसच्या अनिल सावंत यांचा पराभव केला. वैती यांना ६१ मतं मिळाली. 

तर अनिल सावंत यांना ३४ मतं मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेची युती पाहायला मिळाली.