बाईक काढली आणि चंद्रशेखर बावनकुळे थेट संभाजी भिडे यांच्या घरी गेले; बंद खोलीत दोघांमध्ये चर्चा

चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी भिडे यांच्यात काय चर्चा झाली असावी? या प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 

Updated: Nov 13, 2022, 08:52 PM IST
बाईक काढली आणि चंद्रशेखर बावनकुळे थेट संभाजी भिडे यांच्या घरी गेले; बंद खोलीत दोघांमध्ये चर्चा    title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सगळ्यांच्या भुवया उंचावणारी राजकीय घडामोड सांगली जिल्ह्यात घडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(BJP state president Chandrashekhar Bawankule ) यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे(Shiv Pratishthan chief Sambhaji Bhide) यांची भेट घेतली. भिडे आणि बावनकुळे याच्या मध्ये बंद खोलीत चर्चा देखील झाल्याचे समजते. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे(maharashtra politics).

सांगलीत झाली भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची सांगलीत भेट घेतली. बावनकुळे हे मोटारसायकल वरून भिडे यांच्या घरी गेले.  यावेळी संभाजी भिडे यांनी बावनकुळे यांचा सत्कार केला. 

भेटीचा तपशील गुलदस्त्यात

भिडे आणि बावनकुळे यांच्या मध्ये बंद खोलीत चर्चा झाली. भिडे आणि बावनकुळे याच्या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.  चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी भिडे यांच्यात काय चर्चा झाली. याबाबतची काहीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे या भेटी मागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी भिडे नेहमीच चर्चेत

चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी भिडे हे दोघेही नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखील आले आहेत.