भाजप बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वाचा कस निवडणुकीत?

भाजपविरोधात बंडखोरी करणारे आमदार अनिल  गोटे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत लोकसंग्राम पक्षाच्या नेतृत्वात स्वतःचे ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. 

Updated: Dec 1, 2018, 09:27 PM IST
भाजप बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वाचा कस निवडणुकीत? title=

धुळे : भाजपविरोधात बंडखोरी करणारे आमदार अनिल  गोटे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत लोकसंग्राम पक्षाच्या नेतृत्वात स्वतःचे ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मात्र गोटेंची भूमिका अनेक अर्थाने संदिग्ध आहे.त्यामुळे गोटेंच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार आहे. 

आमदार अनिल गोटेंनी भाजप विरोधात बंड पुकारला आणि आपण स्वतः महापौर पदाचे उमेदवार असल्याचे घोषित केले. नंतर आदमरकीचा राजीनाम्याचे अस्त्र मागे घेत महापौर पदाच्या उमेदवारीवरूनही त्यांनी माघार घेतली. पत्नी हेमा गोटे यांना महापौर पदाचे उमेदवार म्हणून पुढे केले. 

भाजपवर त्यानी एका पाठोपाठ एक असे गंभीर आरोपही केले. मात्र त्यांच्या या उठावाची दखल पक्षाने न घेता उलट त्यांच्या विरुद्ध नव्या दमाची भाजपची फळी उभी केली. आता आमदार गोटेंनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांना शहवासीयांच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. 

गुंडगिरीला विरोध करणाऱ्या गोटेंना शहरातील गुंड आणि त्यांना सर्मथन देणाऱ्यांची सोबत चालते. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या काही लोकांच्या कुटुंबातील लोकांना ते उमेदवारी देतात, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. मात्र या सर्व आरोपांचा खुलासा गोटे हे आपल्याच शैलीत केलाय. 

धुळे महापालिका निवडणूक ही आमदार अनिल गोटेंच्या अस्तित्वाची लढाईला निर्माण झाली असून त्यातून ते कसे तावून सुलाखून निघतात याची चर्चा धुळ्यात सुरु आहे.