अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज; टीका नको, भाजप नेत्यांची संघाला विनंती

एकीकडे अजित पवार आणि महायुतीमधल्या मंत्र्यांचे खटके वाजतायत... तर दुसरीकडे संघाशी संबंधित साप्ताहिकांमधून अजित पवारांवर टीका करण्यात येतेय.. मात्र याचवेळी अजित पवारांच्या मदतीला भाजपचे नेते धावले आहेत.

वनिता कांबळे | Updated: Jul 24, 2024, 09:48 PM IST
 अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज; टीका नको, भाजप नेत्यांची संघाला विनंती title=

RSS On Ajit Pawar : लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या निकालानंतर भाजप नेते तसंच संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर सडकून टीका करण्यात आली.. अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपला तोटा झाल्याचा रोख या सर्वच टीकांमध्ये होता..  संघांचं मुख्यमत्र ऑरर्गनाझर आणि संघ विचाराचे साप्ताहिक वैभव यामधून अजित पवार यांच्यावर टीका झाली होती. संघाकडून अजित पवारांवर शाब्दिक वार होत असताना आता भाजप नेते अजित पवारांच्या मदतीला धावले आहेत... 

भाजप-संघ बैठकीत काय चर्चा झाली? 

विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपकडून संघाला करण्यात आली आहे. अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज, त्यामुळे त्यांच्यावर टीका नको असेही भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. विधानसभा निवडणूक जवळ असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा अशा सूचना संघाकडून भाजप नेत्यांना करण्यात आल्या.  

लोकसभेत ज्या चुका झाल्या त्यावर भर देण्यासंदर्भात भाजप नेत्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजप नेत्यांनी संघाच्या नेत्यांना अजित पवारांबाबत सबुरीनं घेण्याचं सांगितल्याचं कळतंय.. 
दरम्यान दिल्लीतही अजित पवारांबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. पक्षातल्या नेत्यांसह अमित शाहांसोबत अजित पवारांनी भेट घेतल्याचं समजतंय.. विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. 7 तासांच्या दिल्ली दौ-यानंतर अजित पवार रातोरात पुन्हा महाराष्ट्रात परतले... 

अजित पवारांच्या दिल्ली दौ-यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अजित पवारांची मुंबईत भेट घेतली...वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय...मात्र, अमित शाहा आणि अजित पवारांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर फडणवीसांनीही अजित पवारांची भेट घेतलीय... दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. भाजपच्या पुण्यातल्या अधिवेशनातही फडणवीसांनी अजित पवारांना महायुतीत का घेतलं याचं कारण सांगितलं होतं. त्यामुळे विधानसभेतही अजित पवारांना सोबत घेऊनच जाणार असल्याचे संकेत फडणवीसांनीही दिले आहेत..