Maharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 

Updated: Mar 9, 2023, 03:50 PM IST
Maharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य  title=

Sharad Pawar Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांच्या याच चाणिक्यनितीचा वापर करत भाजप नागालँडमध्ये (Nagaland) सत्तेत सहभागी होणार आहे. नागालँडमधील एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा आश्चर्यजनक निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. राजकारणाचे हेच नवे समीकरण आता महाराष्ट्रातही पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येवू शकते. भाजपचे खासदार   उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. राजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.   

राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार

नागालँड निवडणुकांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळणार आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्षवेधी यश मिळवले आहे. राष्ट्रवादीने इथं पहिल्यांदाच सात जागा जिंकल्या. मात्र, 10 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्षासाठी दावा करप शकत नाही. यामुळे सरकारला पाठिंबा देत थेट सत्ताधाऱ्यांसोबत बसण्याच्या निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. 

नागालँड विधानसभेत 60 आमदार आहेत. यापैकी एनडीपीपीचे 25 आमदार आहेत. भाजपनं 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार विजयी झाले आहेत. एनडीपीपी-भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. 

नागालँड निवडणुकांचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर

नागालँड मध्ये राष्ट्रवादी भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत. यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागालँडमधील सत्तास्थापनेच्या बैठकीला मी नव्हतो त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. तिथं जे ठरला तसचं उद्या इथे ही ठरले आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल..माहिती नाही... पण वेट अँड वॉच अस राजे म्हणाले. 
राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र मध्ये एकत्र येतील का या प्रश्नावर थेट उत्तर न देता भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 

2019 मध्ये झाला होता अयशस्ववी प्रयत्न

2019 मध्ये काही क्षणासाठी का होईना राष्ट्रवादी भाजप एकत्र सत्तेत आले होते. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत घेतलेल्या सकाळच्या शपथविधी आजही चर्चेत आहे. 2014 च्या निवडणूक निकालानंतर भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीनं जाहीर केली होती. तसेच अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न उघडपणे झाल्यास  महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दबरदस्त धक्का बसू शकतो.