भाजप खासदाराच्या सुनेकडून गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

Allegations of domestic violence : येथील भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने कौटुंबीक हिंसेचा (Domestic violence) आरोप केला आहे.  

Updated: Sep 8, 2021, 01:55 PM IST
भाजप खासदाराच्या सुनेकडून गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट title=
Pic Courtesy : twitter

वर्धा : Allegations of domestic violence : येथील भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने कौटुंबीक हिंसेचा (Domestic violence) आरोप केला आहे. खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सूनेचा हा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  (Rupali Chakankar) यांनी ट्विट केला आहे. व्हिडिओद्वारे त्यांनी राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. रामदास तडस यांच्या सूनेला मारहाण होत आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट केले आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Bjp Mp Ramdas Tadas's Daughter In Law Making Serious Allegations )

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांची सून यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझे पदाधिकारी आणि पोलीस सरंक्षणासाठी पोहोचले आहेत, असे त्यांनी रुपाली चाकणकर यांनी ट्विट करताना म्हटले आहे.

दरम्यान, तडस यांच्या सूनेने गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओत त्यांनी म्हटलेय, मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागत आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी विनंती करते. या व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.