अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : धर्मांतर विरोधी कायदा ( Anti Conversion law) व्हावा आणि लव जिहाद विरोधी कायदा (Love jihad) व्हावा यासाठी भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदा राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra legislature) हे नागपुरात 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात आमदार आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) विधानपरिषदेत खाजगी विधेयक मांडणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी अजब मागणी केली. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. (bjp mla pravin pote patil demanded to stop benefiting from government schemes who love jihad and his family member)
लव जिहाद करणाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा फायदा देण्यात येऊ नये. तसेच शिक्षणात, नोकरीत, तसेच शासकीय कुठलेही अनुदान त्यांना मिळायला नको, अशा रतुदी करण्यात याव्या अशी मागणी या विधेयकातून करणार येणार आहे, अशी माहिती स्वत: पोटे यांनी दिली आहे. पोटे यासाठी येत्या 18 तारखेला अमरावतीत एक भव्य मोर्चा काढणार आहेत.
राज्यात धर्मांतर विरोधी आणि लव्ह जिहाद कायदा लागू व्हावा ही सर्वात पहिली मागणी अमरावतीचे विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केली होती. ते विधेयक आता हिवाळी अधिवेशनात मांडण्यात असल्याचं त्यांनी खुद्द सांगितलंय.
महाराष्ट्रात 25 हजारापेक्षा अधिक मुली वेगवेगळ्या समाजातल्या तरुणांसोबत पळून गेले आहे. पळून गेल्यानंतर त्या मुलींचं धर्मांतर केलं जातं. त्यानंतर त्या तरुणी कुठे जातात ते सुद्धा आजपर्यंत समजू शकलेलं नाही. त्यामुळे हा कायदा करणं गरजेचं आहे. या कायद्यामध्ये कोणतीही पळवाट असू नये यासाठी जे लोक धर्मांतर आणि लव्ह जिहाद करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यामध्ये काम करतात जे लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. अशा अपप्रवृत्ती विरोधात शासनाने निर्बंध आणले पाहिजे, शिक्षण, नोकरी इतर कोणतेही शासकीय लायसन्स याला शासनाने ब्रेक मारला पाहिजे, शासनामार्फत देण्यात येणारे सर्व फायदे थांबविले पाहिजे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांनी दिली.
सोबतच 18 तारखेला सखल हिंदू मोर्चा लव जिहाद व धर्मांतर कायदा विरोधी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मूक मोर्चा काढणार आहे, यामध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त लोक सहभागी होणार असल्याची माहिती प्रवीण पोटे यांनी दिली.