भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल - फडणवीस

Maharashtra Political Crisis​ : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  

Updated: Jun 30, 2022, 09:09 AM IST
भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल - फडणवीस title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तसेच फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले.

भाजपची पुढील रणनीती आज ठरणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत फडणवीस आणि एकनाथ शिंदे चर्चा करुन निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. हे अडीच वर्षाचं सरकार पुढचे पंचवीस वर्ष चालेल. एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार यांचे विशेष आभार. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटानं हिंमत केली. या एकनाथ शिंदे गटाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे, असे फडणवीस म्हणाले. पुढील सूचना येईपर्यंत भाजपच्या सर्व आमदारांनी मुंबईतच थांबावे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटची कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी भाजपने   ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा मार्ग अवलंबला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेना आहे, यावरही चर्चा झाली. भविष्यात आपण काय भूमिका घ्यायच्या यावरही चर्चा झाली. त्यानुसार सरकार स्थापन करण्याचा निर्णय ठरल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.