पोलिसांनी भाजप नेते यशवंत सिन्हांना ताब्यात घेतलं

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 4, 2017, 08:31 PM IST
पोलिसांनी भाजप नेते यशवंत सिन्हांना ताब्यात घेतलं title=

अकोला : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग आणि धानाच्या प्रश्नावर सरकारी अनास्थेविरोधात हा मोर्चा होता. या आंदोलनात ५०० वर आंदोलक कार्यकर्तेही ताब्यात घेण्यात आलंय. या सर्व आंदोलकांना सध्या अकोल्याच्या पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आलं आहे.

यशवंत सिन्हांचा यापूर्वीही भाजपविरोधी सूर

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचा यापूर्वी देखील भाजपविरोधी सूर दिसून आला आहे. त्यांनी भाजप खासदार नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती, नाना पटोले यांचे देखील अनेक वेळा भाजपविरोधी सूर दिसून आले आहेत.