तुम मुझे कब तक रोकोगे? पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना

वेळ आली तर उद्या जीव सुद्धा ओवाळून टाकेन, असं पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं

Updated: Oct 15, 2021, 05:02 PM IST
तुम मुझे कब तक रोकोगे? पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना title=

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.

कोणत्या नेत्यांची चमचेगिरी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून फुलं नव्हते टाकत, भगवान बाबांच्या श्रद्धेपोठी आणि तुम्ही इथे आलेत तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते. बैलगाडीत बसले, उस तोड कामगारांचा कोयता होता, उससुद्धा त्याच्यावर प्रतिकात्मक काढून आणला होता. पण मला बैलांची भीती वाटत होती, बैल खवळले तर काय, ते मला म्हणाले ताई बैल लय गरीब आहेत. पण माणसं गरीब नाहीत. 

आई जशी मुलाची दृष्ट काढते, तसा आज तुमच्यासमोर पदर ओवाळला, वेळ आली तर उद्या जीव सुद्धा ओवाळून टाकेन, तुमच्या शिवाय मला कोण आहे, जो म्हणतो तुला या मखमलच्या खुर्चीवर बसवेन. माझं तुमच्याशिवाय कोण आहे. हा शब्द भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाल देते. जो मोठ्या जातीत जन्म घेतो, राजघराण्यात जन्म घेतील त्यांनासुद्धा गर्व नाही झाला पाहिजे. जो गरीब जातीत, पिछड्या जातीत जन्म घेतो, त्याचीसुद्धा मान खाली गेली नाही पाहिजे. 

आजची महाराष्ट्रची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीतून लोकांना दिशा देण्यासाठी ही भक्तीची आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं राजकारण नाही, आज इथे सामान्य माणसाची चळवळ इथून मोठी उर्जा घेते. छोटीशी ज्योत मोठीशी मशाला बणून पूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते. सामन्य, वंचिताल इथून उर्जा मिळते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

सकाळी भाषणात मोहन भागवत म्हणाले या देशात भेदवान नाही झाला पाहिजे, मुंडे साहेबांनीही सुद्धा हेच केलं, भेदभाव मिटला पाहिजे. 

तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी मे कुछ सपने लेकर जेबो मे कुठ आशाऐें, दिल मे अरमान यहीं की कुछ कर जाये, सुरजसा तेज नही मुझमे दिपकसा जलता खोगे, तुम मुझे कब तक रोकोगे? अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हा मेळाव होईल की नाही अशी चर्चा होती. सत्ता नाही तर मेळावा नाही, कधी या मेळाव्याने सत्ता बघितली, मुंडेसाहेब सत्तेत होते का, तरी लाखोंच्या संख्येने लोक येत होते. पण कशे राजासारखे राहिलात की नाही. सत्ता नाही म्हणून मेळावा नाही, कसं आपली परंपरा आहे. कुणी म्हटलं अतिवृष्टी झाली आहे, कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही, मी म्हटलं, अशाच वेऴी लोकांना उर्जा देण्यासाठी मला मेळावा घ्यायचा आहे. अधिकारी विचारत होते, ताई किती लोकं येणार, मी म्हटलं मला माहिती नाही, मी तर जाणार आहे. 

साडेचारशे-पाचशे पोलीस आले आहेत, तसंच तर भगवान बाबांचा कार्यक्रम आणि पोलिसांचं नातं तर जुनचं आहे. आता जर पाचशे लोकं येणार असतील तर लोकं किती येणार हे मी कसं सांगू. एवढ्या संख्येने तु्म्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्या समोर श्री भगवान कृष्ण साक्षात आहे. उपाशी माणूस उपाशीच आहे, आणि ज्याचं पोट भरलंय त्याचं अजून पोट भरून भरून त्यांची पोटं वाढलीत असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझ्या आयुष्यात मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवान बाबांची मुर्ती आहे. इथं ज्या व्यक्तींबदद्ल बोलून भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला इथे उल्लेख करायचा नाहीए. आणि अशा कुठल्या प्रवृत्तीचा सुद्ध मला इथे उल्लेख करायचा नाही. माझा दौरा लिहून घ्या उस तोड कामगारांशी संवाद साधणार. कोरोना होता, लोकं मरत होती, औषध मिळेना, बेड मिळेना, लोकांची अशी अवस्था असताना मी दौरे करायला होते, तुमची काळजी वाटली म्हणून मी दौरे केले नाहीत, पण घरात बसले नाही. शिरूरला कोविड सेंटर सुरु केले. घरोघरी आम्ही मदत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरु केलं. पण आपल्या देशात प्रार्थनालय स्वच्छ नाही, रुग्णालय स्वच्छ नाही, विद्यालय स्वच्छ नाही, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करणार आहे, आपल्या गावातील प्रार्थनालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेऊया. असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं.