'उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार', किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा

'उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार', धक्काबुक्की प्रकरणानंतर सोमय्यांचा गंभीर इशारा 

Updated: Feb 6, 2022, 01:24 PM IST
'उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार', किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा  title=

पुणे : पुणे महापालिकेमध्ये जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या धक्काबुक्की दरम्यान पायऱ्यांवरून घसरून पडले. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

पुण्यातील संचेती रुग्णालयाचे किरीट सोमय्यांनी आभार मानले. काल जी दुखापत झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सगळे रिपोर्ट केले आणि उपचार केले. काल उद्धव ठाकरे माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला अडवण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, परत त्याच ठिकाणी आता जात आहे असं सोमय्या म्हणाले. 

पुढे सोमय्या बोलताना म्हणाले की, जे काल महापालिकेत माफीयासेनेनी गुंडगिरी केली होती. ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून केली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला. पुणे पोलिसांकडे तक्रार देणार आहे ती त्यांना पोलिसांपर्यंत घेऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. 

कोव्हिड सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचं उत्तर देणं भारी पडणार आहे. तीन लोकांवर सुजित पाटकर, संजय राऊत आणि  ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

धक्काबुक्की दरम्यान सोमय्या यांना दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.